तुमच्याकडे कोणती कौशल्ये किंवा क्षमता आहेत

मानव हे प्रतिभांची खाण आहे. एक मनुष्यालाच देवाने प्रतिभावान बनवले आहे. प्रत्येकामध्ये काही न काही कौशल्ये ही असतातच कुणाची विकसित झालेली असतात तर कुणाला ती विकसित करावी लागतात एवढच आजकाल सॉफ्ट स्किल्स चा जमाना आहे आणि सॉफ्ट स्किल्स शिकण ही काळाची गरज आहे.
जी स्किल्स आपल्या कडे आहेत त्या स्किल्स ना धार लावण्याची आणि नवीन स्किल्स अवगत करण्याची गरज आहे या उपर जाऊन मी म्हणेन आता अजून नवीन स्किल्स शोधून काढण्याची सुद्धा गरज आहे.
आपली कौशल्ये ही आपल्या साठी वरदान आहेत कारण आज प्रत्येक क्षेत्रात स्किल्स ची गरज असते. संवाद कौशल्य(communication skill), समस्या सोडवण्याच कौशल्य(problem solving skill), आय कॉन्टॅक्ट, लक्ष पूर्वक ऐकणे, मोटीवेट करणे इत्यादी.
मी आभारी आहे माझ्या कौशल्यांची. मला नवीन गोष्टी शिकायला आवडत तसेच वेगवेगळ्या गोष्टींची माहिती करून घ्यायला आवडत ही कौशल्ये नेहमी माझ्या ज्ञानात भर घालतात त्यामुळे आज माझ्या समोर अर्थार्जनाचे मार्ग ही खुले झाले आहेत.
त्यामुळे मला माझी ओळख बनवायला खूप मदत झाली.
माझी आणखी कौशल्ये म्हणजे संगीत आणि लेखन या दोन कौशल्यांचे सुद्धा मला आभार मानावेसे वाटतात कारण या कौशल्यांमुळे मला एक ओळख मिळाली तसेच पाहिले जी लोक मला ओळखत ही नव्हती आज ती लोक मला नावानीशी ओळखतात आणि याच श्रेय जात ते माझ्या लेखन कलेला आणि संगिताला.


मी कथा कविता लिहू लागले लेख लिहू लागले आज वाचक ते वाचतात काय चूक काय बरोबर याच्या प्रतिक्रिया ही देतात वाचून खूप छान वाटत यामधून आपण नेमकं पुढे काय केलं पाहिजे काय नाही याचा अंदाज देखील लावता येतो त्याच कवितांचा व्हिडीओ बनवते कविता सादर करते त्या ऐकून ऐकणारे श्रोते "तु खूप छान गातेस कविता ही छान करतेस" अश्या प्रतिक्रिया देतात त्या वाचून एक हुरूप येतो.
पण इथे आणखी एक सांगावस वाटत ते म्हणजे माझ्या या दोन्ही कला मला माझ्या कुटुंबाकडून मिळालेली देणगी आहे अस मला वाटतं आज मी जे काही आहे ते त्यांच्या मुळेच आणि याचा मला अभिमान देखील वाटतो.
मी या देणगी ला आयुष्यभर असच सांभाळीन.
आपल्या प्रत्येकामध्ये काही सुप्त गुण हे असतातच गरज असते ती त्या सुप्त गुणांना शोधण्याची आणि त्यांना चकाकी देण्याची एकदा का ते गुण ती कौशल्ये व्यवस्थीत उजळली की मग आपोआपच आपण ही चमकतो. आणि याच कौशल्यांमुळे आपलं समाजात मानाचं स्थान देखील निर्माण होत.
माझं म्हणणं पटल असेल तर मला नक्की कमेंट करा 

Comments

You must be logged in to post a comment.